दोन दिग्गज दिग्दर्शकांनी एकत्र येऊन चित्रपट बनवावा, हे बॉलिवूडच्या इतिहासात क्वचितच घडलं असेल. परंतु, हा दुर्मिळ योग पुन्हा येणार आहे. रोहित शेट्टी आणि करण जोहर हे दोन मातब्बर दिग्दर्शक बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग याला सोबत घेऊन चित्रपट तयार करणार आहेत. 'सिम्बा' असं नाव असलेल्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर झळकलं असून ते चांगलंच व्हायरल झालं आहे.रणवीरच्या भूमिकेबाबत बोलताना रोहित शेट्टी म्हणाला, 'सिम्बामध्ये रणवीर तुम्हाला एका हटके भूमिकेत दिसणार आहे. रणवीरमध्ये वेगळ्याच प्रकारची उर्जा आहे. त्याच्यातील तो सळसळता उत्साह स्क्रिनवरही सहज जाणवतो. 'सिम्बा'ची कथा पडद्यावर साकारण्यासाठी अशाच उर्जेची गरज आहे. रणवीरची ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,' असेही तो म्हणाला. 'बाजीराव-मस्तानी'तील बाजीरावनंतर रणवीरची ही दुसरी मराठी भूमिका असेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews